तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : पैठण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी  दि.२ एप्रिल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने बुधवारी सुद्धा सायंकाळी सहा वाजेनंतर हजेरी लावली.

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला.गारांच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः गहू, हरभरा, कांदा आणि फळबागांना याचा फटका बसला आहे.मोसंबी,आंबे डाळिंब,गळून पडले आहेत.या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोटाकुलिस आला असून शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे सुरू करण्यात आले असून नुकसानाचा आढावा घेतला जात आहे.


दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही अशाच प्रकारच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अचानक आलेल्या हवामान बदलामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.